न्यायका पाखंड करती अदालत
-मंजुल भारद्वाज
मोठ्यांनी म्हणा,
इंन्कालाब झिंदाबाद
स्मरण करा
भगतसिंहाना फांसी
देणाऱ्या ब्रिटिश न्यायालयाचे
मोठ्यांनी म्हणा आता,
जय हिंद
आणि स्मरण करा
सरकारच्या नितीला विरोध
करणाऱ्यां कैदखान्यात बंद बुध्दीजीवींना...
जे निरपराध असतानाही
त्यांना जामिन मिळत नाही...
आपल्याला फरक वाटतो का?
गुलामांचे न्यायालय
लोकतंत्राच्या नांवाखाली
तानाशाहच्या न्यायालयात
एकच समानता आहे
न्यायाला असत्य बनवत
सत्ताधीशांच्या बाजूने
उभे आहे न्यायालय
आता म्हणा श्रीराम
आणि
गोळी खात धारातिर्थी
होणाऱ्या गांधीचे शब्द
ऐका.....
हे राम !
....
अनुवाद-स्वप्नजाघाटगे
No comments:
Post a Comment