Tuesday, February 3, 2026

आम्ही आदिवासी – मंजुल भारद्वाज

 आम्ही आदिवासी
मंजुल भारद्वाज

 

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …

देशाचे मूळ निवासी …

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …

 

आम्ही जंगलात राहतो

हो … हो …

आम्ही डोंगरावर फिरतो

हो … हो …

आम्ही वाघासोबत बागडतो

हो … हो …

आम्ही निडर, बहादूर, धाडसी …

 

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …

देशाचे मूळ निवासी …

तुम्ही पाणी आमचा चोरता

मग चार टाळकी बसता

मग तुम्हीच कायदा काढता

आणि आमची जागा लुबाडता

आणि म्हणतात कसे

लोकशाही आहे


आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …

देशाचे मूळ निवासी …

 

आम्ही झाडांना सांभाळतो

हो … हो …

आम्ही निसर्गाला जपतो

हो … हो …

आणि आम्हीच उपाशी मरतो

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी

देशाचे मूळ निवासी

आणि आम्हीच मरतो उपाशी…

 

असा या देशाचा कारभार

लोकं म्हणे शिकले

शिकून लय मोठे झाले

बाजार आणलाय

शहर मोठे मोठे झाले

मोठा मोठा पगार घेतात

लाख लाख घेतात

बंगला पण बांधलाय

मोटारगाडी आणलीय

आणि ….

मोठा आजार घेतलाय

आजार बाजार व्यापार

अरे बंद करा बंद करा

जीवनाचा व्यापार बंद करा …




केला निसर्गाचा सत्यानाश

आणि याला हे म्हणतात

हा बघा विकास

 

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …

देशाचे मूळ निवासी …

कॉम्प्युटर आणलाय

म्हणे जग एक झालं

एक झालं म्हणजे काय हो ?

जागतिकीकरण

आणि यात आम्हा आदिवाशांचे मरण…

पर्यावरणाची बोंबाबोंब !!

 

मायेचं तापमान वाढलंय

निसर्गचक्र बिघडलंय…

 

चला जागे होऊया

चला एक होऊया

घडवूया आपलं अस्तित्व

करूया यांच्या विकासाचा

अस्त अस्त अस्त …




No comments:

Post a Comment

आम्ही आदिवासी – मंजुल भारद्वाज

  आम्ही आदिवासी – मंजुल भारद्वाज   आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी … देशाचे मूळ निवासी … आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …   आम्ही ज...