मी वेडेपणा शोधतो आहे….
मला तुम्हाला वेडं करायचंय....,
मी शोधतो आहे
इतिहासात होता तो
तो भगतसिंग कुठे आहे?
मी तो वेडेपणा शोधतो आहे,
….. मी वेडेपणा शोधतो आहे
मी मेलेले सत्व शोधतो आहे....
कुठे आहे ती सावित्रीबाई निघाली होती एकटीच...
तिचे धैर्य शोधतो आहे,
मी वेडेपणा शोधतो आहे...
….. मी वेडेपणा शोधतो आहे
मी आग शोधतो आहे पेटवण्यासाठी,
मेलेल्यानां जगवण्यासाठी....
कारण मी शोधतोय वेडेपणा माणुसकी साठी,
थकलेल्या डोळ्यांमध्ये आशेचा किरण शोधतोय...
….. मी वेडेपणा शोधतो आहे
मी वेडेपणा शोधतोय,
आयुष्याच्या धावपळीत जीवन शोधतोय...
कुठे हरवली ती पाखरे
त्यांच्या श्वासात भरारी शोधतोय,
मी वेडेपणा शोधतोय.... …..
……मी वेडेपणा शोधतो आहे
बहिणाबाई चे सरळ सात्विक
जीवनतत्व, जीवन दर्शन आणि संघर्ष
कबीराचे अध्यात्म, कणखरपणा आणि साधेपणा
बुद्धाची अहिंसा आणि शांती....
….. मी वेडेपणा शोधतो आहे

#जुनून #Passion #ManjulBhardwaj
- मंजुल भारद्वाज
मला तुम्हाला वेडं करायचंय....,
मी शोधतो आहे
इतिहासात होता तो
तो भगतसिंग कुठे आहे?
मी तो वेडेपणा शोधतो आहे,
….. मी वेडेपणा शोधतो आहे
मी मेलेले सत्व शोधतो आहे....
कुठे आहे ती सावित्रीबाई निघाली होती एकटीच...
तिचे धैर्य शोधतो आहे,
मी वेडेपणा शोधतो आहे...
….. मी वेडेपणा शोधतो आहे
मी आग शोधतो आहे पेटवण्यासाठी,
मेलेल्यानां जगवण्यासाठी....
कारण मी शोधतोय वेडेपणा माणुसकी साठी,
थकलेल्या डोळ्यांमध्ये आशेचा किरण शोधतोय...
….. मी वेडेपणा शोधतो आहे
मी वेडेपणा शोधतोय,
आयुष्याच्या धावपळीत जीवन शोधतोय...
कुठे हरवली ती पाखरे
त्यांच्या श्वासात भरारी शोधतोय,
मी वेडेपणा शोधतोय.... …..
……मी वेडेपणा शोधतो आहे
बहिणाबाई चे सरळ सात्विक
जीवनतत्व, जीवन दर्शन आणि संघर्ष
कबीराचे अध्यात्म, कणखरपणा आणि साधेपणा
बुद्धाची अहिंसा आणि शांती....

#जुनून #Passion #ManjulBhardwaj
No comments:
Post a Comment